मुंबई : कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरु करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कांदा उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसंदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन ही मर्यादा वाढवून घेण्याचा शासन प्रयत्न करील, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
रवींद्र जडेजाची नाबाद मॅच विनिंग खेळी; चेन्नईचा कोलकातावर शेवटच्या चेंडूवर विजय
सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं; राधाकृष्ण विखे पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र
“राज ठाकरे यांना सरकारला बोलण्याचा पूर्ण अधिकार, मात्र मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत”
चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय