सांगली : नागरिकत्व कायद्याला जे लोक विरोध करत आहेत ते देशद्रोही आहेत, अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिली आहे.
या कायद्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत व्हायला हवं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनेतेने या कायद्याबद्दल आनंद साजरा करायला हवा, असंही संभाजी भिडे म्हटलं आहे.
नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांतील स्थिती अधिकच चिघळली असून उत्तर प्रदेशात तर हिंसाचारात 5 जणांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि मालेगाव या शहरांतही विराट मोर्चे काढून या कायद्याविरुद्ध निषेध नोंदवण्यात आला. या कायद्यावर वेगवेगळे मतप्रवाह असताना संभाजी भिडे यांनी आंदोलकांना थेट देशद्रोही म्हणून नव्या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचं सुचक वक्तव्य!
-डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार
-आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी
-“पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत पडू नका”