मुंबई : मुंबई सेंट्रलच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री 9 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास 200 हून अधिक दुकानं आहेत. या सर्व दुकानांमध्ये मोबाईलची दुकानं जास्त आहेत. त्यामुळे दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.
दरम्यान, सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या 55 मजली इमारतीतील अंदाजे 3500 लोकांचे जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले
खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर…- अंजली दमानिया
महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय