पुणे : डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लागू निरीश्वरवादी असल्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही धार्मिक विधी झाल्या नाहीत. लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत ठेवण्यात आलं होतं.
डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री दीपा श्रीराम, मुलगा आनंद लागू, मुलगी डॉ. शुभांगी कानिटकर, जावई डॉ. श्रीधर कानिटकर आणि लागू कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
मंगळवारी रात्री जेवणानंतर लागू यांनी व्हीलचेअरवरून फेरफटका मारला. त्यांना चक्कर आल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचं निधन झालं. मुलगा आनंद अमेरिकेहून आल्यानंतर डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेते राजन भिसे तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह अनेकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
महत्वाच्या घडामोडी-
-आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी
-“पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत पडू नका”
-भाजपाचे नेते कोणी आपल्याकडे बघत नाही ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवणी करतात
-ट्रेलर रिलीजनंतर छपाकची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल नाराज