मुंबई : भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी मदरसें बंद करण्याचं धाडस दाखवावं, असं म्हटलं होतं. यावरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीका केली आहे
मागील पाच वर्षे राज्यात भाजपचं सरकार होतं. मात्र, तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप मूळ मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्द्यांना हात घालत आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करून दाखवून द्यावं. नाहक नागरीकांचे लक्ष विचलित करू नये असंही जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एमआयएम पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले. महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला. यावेळी अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
हुश्श…जिंकलो! दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय
मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”