दुबई : आजच्या आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 176 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डीकाॅकने सर्वाधिक 43 चेंडूत 53 धावा केल्या. तर कृणाल पांड्याने 30 चेंडूत 34 धावा, कायरान पोलार्डने 12 चेंडूत 34 धावा, नॅथन कुल्टर नाईलने 12 चेंडूत 24 धावा केल्या. तर पंजाबकडून मोहम्मद शमी व अर्शदिप सिंगने 2 विकेट घेतल्या, तर ख्रिस जाॅर्डन व रवी बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना पंजाबनेही 20 षटकात 5 गडी गमावत 176 धावाच केल्या. पंजाबकडून कर्णधार के.एल.राहूलने सर्वाधिक 51 चेंडूत 77 धावा केल्या. तर ख्रिस गेल व निकोलस पूरनने प्रत्येकी 24 धावांचे योगदान दिले. तर दीपक हुड्डाने 16 चेंडूत 23 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रित बुमराने 3, तर राहूल चहरने 2 विकेट घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी-
महिलांच्या लोकल प्रवासाठी भाजपचा आवाज बंद का?; सचिन सावंतांचा भाजपला सवाल
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”
“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”