दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावत 179 धावा केल्या. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लसिसने 47 चेंडूत 58 धावा, शेन वाॅट्सन 28 चेंडूत 36 धावा, अंबाती रायडूने 25 चेंडूत 45 धावा, तर रविंद्र जडेजाने 13 चेंडूत 33 धावा केल्या. तर दिल्लीकडून नाॅर्त्झने 2 तर तुषार देशपांडे व कगिसो रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीने हे लक्ष्य 5 गडी गमावत 2 चेंडू शिल्ल्क ठेवून पूर्ण केले. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद शतक केले. धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. दरम्यान, दिल्लीला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. मात्र अक्षर पटेलने 2 षटकार व 1 चाैकार मारत दिल्लीला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून दीपक चहरने 2, तर शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हाे व सॅम करनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
ये अजित दादा का स्टाईल है! नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं काढण्यावरुन अजित दादा म्हणाले…
दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अंबाती रायडू व फाफ ड्यू प्लसिसची शानदार फलंदाजी; चेन्नईचे दिल्लीसमोर 180 धावांचे लक्ष्य
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल