मुंबई : बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याचबरोबर आता मनसेचे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय, असा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे.
भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय., असं ट्विट करत अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे.
भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकूरवर टीका
“साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या”
औरंगाबाद हादरलं!! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, चिमुकलीचा ओठ तुटला