Home महाराष्ट्र मुंबई दरवर्षी कशी तुंबते?; नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना पत्र

मुंबई दरवर्षी कशी तुंबते?; नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना पत्र

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूर स्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे.

मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असंही नितीन गडकरी यांनी पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळन 4 जणांचा मृत्यू

राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा

राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्रं लिहिलंय का?- बाळासाहेब थोरात