पंढरपूर: सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी 2.30 वाजता कोसळली. या घटनेत 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली भिती व्यक्त केली होती. मात्र त्यापैकी 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटालगत घाटाचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दुपारी 2.30 च्या सुमारास तेथील भाग खचून भिंत कोसळली. त्यात 5 ते 6 जण अडकले असावे, असा अंदाज आहे. स्थानिक लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. परंतु जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडचण येत होती. त्यापैकी 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दरम्यान, तसेच ढिगाऱ्याखाली नक्की किती लोक दाबले गेले हे अजून कळले नसून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड
नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा
राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्रं लिहिलंय का?- बाळासाहेब थोरात
एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी