मुंबई : ऑनलाईन व्यवहार करत असाल तर जरा काळजी घ्या, कारण ओटीपी फ्रॉड करणाऱ्या घोटाळेबाजांचा धंदा वाढत चाललाय. जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर दिली असाल आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट करायला गेलात तर तुमचा अख्खा अकाऊण्ट काही सेकंदांमध्ये रिकामं होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना मुंबईत घडल्या आहेत. नीट लक्षात घ्या, कशी असते या फ्रॉडर्सची काम करण्याची विशेष पद्धत.
ऑनलाईन वस्तू किंवा ऑनलाईन फूड विकणाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन फ्रॉड करणारे कॉन्टॅक्ट एडिट करुन स्वतःचे कॉन्टॅक्ट घालून ऑर्डरसाठी फोन आला की संबंधित व्यक्तीला ओटीपी अर्थात ‘वन टाईम पासवर्ड’ पाठवला जातो. ग्राहकाला फोनवर ओटीपी विचारला जातो आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये अकाऊण्टमधून पैसे लंपास केले जातात.
दरम्यान, आत्तापर्यंत अनेक ग्राहकांना आणि दुकानदारांनाही या ओटीपी फ्रॉडचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी
-भाजपच्या ‘या’ खासदाराने दिला भाजपलाच घरचा आहेर; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणं ही चूक
-“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”
-शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका; त्यांना योग्य तो न्याय द्या- चंद्रकांत पाटील