Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवलं, ते अतिशय दुर्देवी- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवलं, ते अतिशय दुर्देवी- देवेंद्र फडणवीस

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?, असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपाल यांच्याकडे जी निवेदने येत असतात ती निवेदने घेऊन राज्यपाल हे एक पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवलं आहे, ते दुर्देवी आहे., असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे- कंगणा रणाैत

उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र; त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही- संजय राऊत

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचं ठरलं! बिहार निवडणुकीत शिवसेनेशी युती नाही