कोल्हापूर : सोशल मीडियावर 80 हजार बनावट खाती उघडून त्या माध्यमातून अनेक गैरप्रकार केल्याचे अमेरिकेतील विद्यापीठाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या विषयावर भाष्य करत राज्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. यामागे भाजपाचा हात आहे.” असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
देश – विदेशामध्ये असंख्य बनावट खाती सुरू करून त्या माध्यमातून घोटाळे करण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ही बनावट खाती भाजपाकडून चालवली जात होती अशी माहिती पुढे आली आहे. मागील अकरा महिने भाजपाकडून ठाकरे परिवाराला बदनाम करणे, मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणे यासारखे प्रकार या माध्यमातून केले गेले आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, याच माध्यमातून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी ‘टीआरपी’ वाढवण्याचा गैरप्रकारही पुढे आला आहे. चौकशीतून या सर्व गैरप्रकारावर प्रकाश पडेल.” असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाला बलात्काराच्या धमक्या”
दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थान राॅयल्सवर 46 धावांनी मात
एकनाथ खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंद- गुलाबराव पाटील
MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारची घोषणा