Home महाराष्ट्र राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही- उदय सामंत

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही- उदय सामंत

मुंबई : राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं म्हणत उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोल्हापुरात अंतिम वर्षांच्या परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय हा 8 दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. ही ग्रंथालय सुरू करतानाचे नियम येत्या दोन चार दिवसात तयार होईल. त्यानंतर राज्यातील ग्रंथालये सुरू होतील, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ग्रंथालय सुरु करण्यासाठी कोणी कोणाला फोनाफोनी केली म्हणून ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मंदिर नाही पण मदिरा सुरु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का?- संजय राऊत

फडणवीसजी, आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे