मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं एम्सने अहवालात सांगितलं आहे. यावर भाजपचे नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या सरकारनं केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वत: पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा. मुंबई पोलिसांची प्रतिमा ही शौर्याची आहे. त्यांना मोकळेपणाने काम करु द्यावं, त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, अशीच आमची भूमिका होती., असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या तिन्ही पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा प्रत्यारोप राम कदम यांनी केला.
महत्वाच्या घडामोडी-
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार- निलेश राणे
महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या प्रचारासाठी फडणवीस बिहारला जाणार का?- अनिल देशमुख
पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच मृत्यू
खोदा पहाड, निकला चुहां; सुशांतसिंह प्रकरणावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला