मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं एम्सने अहवालात सांगितलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या प्रचाराला जाणार का? असा सवाल अनिल देशमुख यांनी केला.
बिहारच्या निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येचं राजकारण करण्यात आलं, असा आरोप करत अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? महाराष्ट्राला बदनाम करण्याऱ्या बिहारमध्ये फडणवीस प्रचार करणार का? असे सवाल अनिल देशमुख यांनी फडणवीसांना केला आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून, त्याने आत्महत्याच केली असल्याचं एम्सनं जाहीर केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा जनता माफ करणार नाही, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच मृत्यू
खोदा पहाड, निकला चुहां; सुशांतसिंह प्रकरणावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला
अग्गंबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ (बबड्याची आई) यांची कोरोनावर मात
सांगलीत अतिक्रमण हटविताणा महानगरपालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की