वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा टोला

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय. रामदास आठवले आज कराड दौऱ्यावर होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आठवले बोलत होते.

हे ही वाचा :“अजित पवारांनी सांगितलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी व्हावी”

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय ते पाहुया, असं आठवले यावेळी म्हणाले. आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात NCB कडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय, असंही रामदास आठवले यांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

“विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हांला जागे करायला आलोय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here