Home महाराष्ट्र शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुतील पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.

मी यापूर्वी सांगितले होते की, निवडणूक निकालानंतर मातोश्रीवर जाणार आहे. मी शब्दला पक्की आहे. आज मी मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले आणि शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरे मला जी जबाबदारी देतील ती मी नक्कीच पूर्ण करेन आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेबरोबर काम करत लढत राहीन. आपण यापेक्षाही चांगलं काम करणार आहोत. निवडणुकीमध्ये माझ्यासाठी काम करणाऱ्या शिवसैनिकांचे आभार मानते. माझा पराभव झाला असला तरी आता तर खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी दिली.

हे ही वाचा : “…भाजपमध्ये आलोय, ही माझी अडचण; फडणवीसांच्या उपस्थितीत, भर सभेत ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

माझा पराभव झाला असला तरी मला ४० हजार मते पडली आहेत. माझी नऊ हजार मते बाद ठरली. एका सामान्य घरातील लेकीला एवढी मते मिळाली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. जनतेच्या प्रेमामुळेच मला एवढी मते मिळाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. मला महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी सर्वोताेपरी मदत केली. नाना पटोले यांनी दोन सभा घेतल्या. शरद पवार, अजित पवार, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी हे सर्व माझ्यासोबतच होते, असंही शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला

“पंढरपूरमध्ये ठाकरेंचा राजू शेट्टींना धक्का; ‘हा’ आक्रमक नेता शिवबंधन हाती बांधणार”