Home महाराष्ट्र “मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार”

“मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार”

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर अनेकांनी सरकारला धारेवर धरलं होत. यानंतर मराठा आरक्षणासाठी बीडमधील विवेक रहाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे स्वत: मराठा आरक्षणाच्या लढ्यात लक्ष घालणार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी., असं पार्थ पवार म्हणाले.

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही., असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र., असं पार्थ पवार यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे कधी थांबणार आहे?; हाथरस प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची योगी आदित्यनाथांवर टीका

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही- अतुल भातखळकर

“कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय”