मुंबई : बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जर बाबरी मशीद पडली नसती तर राम मंदिराचं जे भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता, असं म्हणत संजय राऊतांनी न्यालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं.
दरम्यान, न्यायालयाने हा कोणताही कट नव्हता असं स्पष्ट केलं आहे. हाच निर्णय अपेक्षित होता. आता आपल्याला तो भाग विसरला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे. जर बाबरी पडली नसती तर आज राम मंदिराचं भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
“दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग चंगला नव्हता”
“भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले”
जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…; निलेश राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका
“धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”