मुंबई : देवेंद्र फडणवीसांना पहाटे पहाटे जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल,.
दरम्यान, सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असेही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले”
जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…; निलेश राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका
“धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”
“उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण”