मुंबई : दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं आश्चर्याचं वाटतं. पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार, असं म्हणत निलेश राणेंनी शरद पवारांवर टिकास्त्र सोडलं.
दरम्यान, या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, असंही निलेश राणे यांनी म्हटलं.
पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही. https://t.co/8gAd4OhL3H
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या”
“उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव