Home महाराष्ट्र हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब...

हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब दानवेंचा टोला

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं समजतं आहे. तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. यावर भाजप नेते वे केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अशी भेट माझ्यात आणि संजय राऊतांमध्ये देखील झाली असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो, असा टोलाही दानवेंनी लगावला आहे.

दरम्यान, हे सरकार पडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही मात्र हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष भाजपला देऊ नये असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन- पंकजा मुंडे

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक; कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…