मुंबई : माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं असून कॅबिनेट विस्तारानंतर सर्व खात्याचे पुन्हा वाटप होईल, असं मत जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केलं आहे.
खातेवाटपात जयंत पाटील यांना अर्थ मंत्रालयासह इतर 8 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान, गृह खात्यासाठी जयंत पाटील हे आग्रही असल्याचं बोललं जात होतं. पण गृहखातं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे ठेवलं आहे.
जयंत पाटील यांच्याकडे खातेेवाटपाबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं होतं. त्यामुळे जयंत पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर पसरु लागल्या आहेत. पण जयंत पाटील यांनी ट्वीट करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप महत्वाचं मानलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!
“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”
-नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची मंजूरी
-27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे