…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये- संजय राऊत

0
259

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हांला सांगा, आम्ही देऊ ओबीसी आरक्षण चार महिन्यात., असं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, कोरोनाच्या काळातही रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी आंदोलनाविषयी संजय राऊतांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता- चंद्रशेखर बावनकुळे

सौ चुहे खाके बिल्ली हज को चली; चक्का जाम आंदोलनावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

“…तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here