सांगली : रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सुरू केलेल्या कोव्हिड रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आतच जात नसतील तर उपचार कसे होणार? मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललंच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे., असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये भरमसाठ पैसे उकळतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. लुटीच्या भीतीने लोक आजार दडवतात. उपचारात टाळाटाळ केल्याने अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला अखेरच्या क्षणी रुग्णालयात दाखल केले जाते. वेळ निघून गेल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होतो. यातून वाढणारा मृत्यूदर रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना प्रामाणिकपणे काम करावे लागेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न”
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त”
मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात