मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना नोकर भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं आहे, असं मत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं.
ठाकरे सरकारच्या या निर्णय़ामुळं मराठा समाज पेटून उठला असून, पोलीस भरतीचा निर्णय चुकीच्याच वेळी घेतली आहे. ‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?, असा सवाल करत महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या पोलीस भरतीला संभाजी राजे यांनी विरोध केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये अशी मागणी करत राज्य शासनानं भरतीचा घेतलेला हा निर्णय म्हणजे एक प्रकारे सरकारकडून मराठा समाजाला दिलेली चिथावणी आहे, असं संभाजी राजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका
“मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”
मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी