दिल्ली : मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी संभाजीराजेंना केली आहे.
राहुल शेवाळे यांनी नुकतंच छत्रपती संभाजीराजे यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी निवेदन देताना त्यांनी ही मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील राज्यव्यापी सर्वपक्षीय लढ्याचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावी, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या हक्काच्या या लढाईत माझाही पूर्णपणे पाठिंबा आणि सहभाग नेहमीच राहील, असंही राहुल शेवाळे यांनी संभाजीराजेंना म्हटलं आहे.
दरम्यान, तसेच या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंती राहुल शेवाळे या निवेदनात केली आहे.
राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांची दिल्ली येथे भेट घेऊन, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील राज्यव्यापी सर्वपक्षीय लढ्याचे नेतृत्व राजेंनी करावे, अशी विनंती केली. तसेच मराठा समाजाच्या हक्काच्या या लढाईत माझाही पूर्णपणे पाठिंबा आणि सहभाग नेहमीच राहील, अशी खात्रीही राजेंना दिली.
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) September 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”
“माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनावर मात”
……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत
मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावी; ‘या’ नेत्याने केली मागणी