मुंबई : डिजिटलायजेशन झाल्यानंतर बँकेने ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या आहेत. बँकेचे व्यवहारही सोपे झाले आहेत. सुरक्षीत आणि सुटसुटीत व्यवहारासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सोईसाठी YONO हे APP तयार केलं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने पैसे काढण्याची नवीन कार्डलेस सुरू केलीय. त्यामुळे तुमच्याजवळ कार्ड नसलं तरी पैसे काढण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही. मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी एक खास APP तयार केलंय. त्यासाठी पहिले तुम्हाला SBI YONO हे APP डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर युझर आडी आणि पासर्वड टाकून नव्याने लॉगिंन करावं लागेल.
दरम्यान, दररोजच्या व्यवहारात ATM कार्ड ही आवश्यक गोष्ट झालीय. पण ATM कार्ड सुरक्षीत ठेवणं आणि सतत सोबत ठेवणं ही एक अडचणीची गोष्ट असते. ATM कार्ड चोरून त्याचा गैरवापर केल्याच्याही अनेक घटना घडत असतात. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुविधा नागरीकांसाठी बनवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या”
ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं?- एकनाथ खडसे
“पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही”