पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारनगर पोलीस स्टेशनला पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन स्वतः जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष आणि मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष बालाजी पवार यांनी केले होते.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, एसीपी राहुल आवारे, एसीपी गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीसांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

