आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली आहे.
मुंबईहून निघालेले हे विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा कोसळलं. कोसळताच विमानाने पेट घेतला. यामुळे विमानाचा पुढचा भाग जळून खाक झाला.या विमानात एकूण ६ जणांचा समावेश होता, त्यापैकी तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह उरलेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खासदार सुप्रिया सुळे , सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सर्वजण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एकत्र जमले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब सध्या धक्क्यात असून बारामतीसह संपूर्ण राज्यात तणावाचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
CJI सूर्यकांत यांच्या सत्कारावर संजय राऊतांची बोचरी टीका…!
नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने पहिला भगवा फडकवला

