मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या ‘घराच्या बाहेर पडा’ टीकेला उत्तर दिलं. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणाले की,’जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुळात हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला
उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे किती रुग्णालये आणि कोविड सेंटरचं तुम्ही निरीक्षण केलं? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आपली जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली यांचे उत्तर राज्याच्या जनतेला द्यावं. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नाचता येईना अंगण वाकडे pic.twitter.com/RBBmiYUYvE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 13, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”
ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत
मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार- उद्धव ठाकरे