संभाजीनगर आणि मालवणी दंगलप्रकरणावर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : छत्रपती संभाजीनगर येथे 2-3 दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. यात काही तरुणांनी दगडफेक करत पोलिसांसह खाजगी वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर, परवा दिवशी मुंबईतील मालवणी येथे रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान रात्री दोन गटात हाणामारी झाली. या दोन्ही घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या विषयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. यावर काही राजकीय लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. पण, या सगळ्यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे., असं शरद पवार म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यांशी बोलत होते.

हे ही वाचा : “शिंदेंकडे गेलेले अनेक आमदार, उद्धव ठाकरेंकडे लवकरच परत येणार”

दरम्यान, तसेच हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी करावी, असा सल्ला शरद पवारांनी यावेळी राजकीय नेत्यांना दिला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

उध्दव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! शिंदे गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here