“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी व भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंनी राष्ट्रवादी, भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पैठण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : बोम्मईंच्या ट्विटबाबत अमित शहांशी चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं; मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तसेच पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अॅड. प्रतापराव पाटील निंबाळकर, प्रतापराव पाटील धोर्डे, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, भाजपच्या व राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

पुण्यातील बंद बेकायदेशीर, खासदार उदयनराजे भोसलेंना अटक करा; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

शिंदे-फडणवीसांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…

“‘राज’ सरकार!; राज ठाकरेंनी केली मध्यस्थी, अन् ‘त्या’ पोलिसांचे निलंबन मागे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here