Home महाराष्ट्र …नाहीतर मराठा समाजाचे तरुण नक्षलवादाकडे झुकतील; संभाजी बिग्रेडचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

…नाहीतर मराठा समाजाचे तरुण नक्षलवादाकडे झुकतील; संभाजी बिग्रेडचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई : सरकारने सर्वोच्च्य न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी संभाजी बिग्रेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली आहे. पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी नाहीतर हे तरुण नक्षलवादाकडे झुकतील, असं विकास पासलकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी. स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. आरक्षणावर आलेली स्थगिती म्हणजे मराठा समाजातील तरुणांवर झालेला मोठा आघात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावं, अशी मागणीही विकास पासलकर यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये आरक्षण लागू होणार ही की नाही याची माहिती सरकारने तसेच एमपीएससीने द्यावी. हा निर्णय येण्याआधी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका त्यांना बसू नये, असंही विकास पासलकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक

“एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही”

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

…अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता शिवसेनेला माफ करणार नाही- अतुल भातखळकर