“लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं केंद्र सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं “

0
641

मुंबई : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात येतो. यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. याच अहवालातील एका मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

“करोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं. असा विचार करणं कितपत योग्य आहे?,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर सर्वच ठप्प झाल्यानं अनेकाचे रोजगार गेले. यावेळी हातावर पोट भरणाऱ्यांना पुन्हा घर गाठावं लागलं होतं. या काळात सरकारनं थेट आर्थिक मदत करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही”

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ

बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे- किशोरी पेडणेकर

जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here