राष्ट्रवादीत प्रवेशानंतर रूपाली पाटलांनी मनसेच्या ‘या’ नेत्याला दिला दम, म्हणाल्या…

0
858

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर मनसे नेते व रूपाली पाटील यांचे जुने सहकारी वसंत मोरे यांनी  रूपाली पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती.

हे ही वाचा : शरद पवारांचा वारसा, राज्यात असूनही रोहित पवारांना मात्र…; चंद्रकांत पाटलांचा टोला

रूपाली पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा ‘प्री प्लॅन’ होता. पक्षातील नेत्यांकडून त्रास होतो आहे म्हणून पक्ष बदलला हे म्हणणं हास्यास्पद आहे. पक्षातील रिकामटेकडे नेते असे पाटील म्हणाल्या त्यांनी दाखवून द्यावे, कोण रिकामटेकडे आहेत. तसेच राजीनामा देऊन त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याची टीकाही वसंत मोरे यांनी केली होती. यावरून आता रूपाली पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ‘प्री प्लॅनिंग’ नव्हते. पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल होत नव्हते हे बघून मी स्वतः बदलायचे ठरवले आणि तसे घडत गेले. मला असं वाटतंय की, वसंतभाऊ वायफळ बडबड करत आहेत. आम्ही सोबत काम केले आहे, अगदी बहीणभावासारखे, त्यामुळे वसंत भाऊंबद्दल बोलताना मी शांत आहे. पण एका मर्यादेपर्यंतच मी शांत राहू शकते. मला त्यांनी बोलायला भाग पाडू नये., असा दमही रूपाली पाटलांनी वसंत मोरेंना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

शंभूराज देसाई जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढणार?; नगरपंचायत निवडणूकीतून घड्याळ गायब; चर्चांना उधाण

युतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रस्ताव; राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

“महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here