पवारांची तब्येत बिघडली माहित आहे, पण सरकारचं माहित नाही- चंद्रकांत पाटील

0
182

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. परंतु सरकारचं मला माहीत नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार 5 वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं असता, त्यांनी सरकार टिकेल हे का सांगावं लागतं? सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेळी तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं, असं म्हणत पवारांची तब्येत बिघडली आहे हे माहीत आहे, पण सरकारचं मला माहीत नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

ईडीकडून चौकशीची तारीख आली की एकनाथ खडसे यांना कोरोना होतो- गिरीश महाजन

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात; चंद्रकांत पाटलांचा टोला

…पण लॉकडाउन नको; संजय निरुपम उद्धव ठाकरेंवर संतापले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here