“पूजा चव्हाणचा लॅपटाॅप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक गायब”

0
204

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता एका भाजपच्या नगरसेवकाचे नाव पुढे आले आहे. या नगरसेवकाने या प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हा नगरसेवक गायब झाला आहे.

वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. सध्या त्यांचा फोन बंद लागत आहे. धनराज घोगरे हे कालपासून घरीच आले नाहीत. याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना विचारण्यात आले असता धनराज हे सध्या आमच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणात कोणता नवा उलगडा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?- चित्रा वाघ

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरू पंकजा मुंडेंची टीका

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री; ‘नटसम्राट’वरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

“RCB साठी खुशखबर! 14.25 करोडला खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूने ठोकल्या एका षटकात ‘तब्बल’ इतक्या रन्स”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here