“नारायण राणे 22 वर्षे ‘पुन्हा येईन’ची वाट बघतायत, फडणवीस 25 वर्षे बघतील”

0
287

मुंबई : भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. तसेच फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजपा नेते सांगत आहेत, कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही., असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न गेली 22 वर्षं बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. मात्र ‘मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून 25 वर्ष लागतील, असा टोलाही नवाब मलिकांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी

“GST विरोधात 26 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांकडून ‘भारत बंद’ची हाक”

भाजप शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहे- जयंत पाटील

राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने- अजित पवार

राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here