मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य; म्हणाले…

0
307

मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असंही सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊतांना महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे; निलेश राणेंची टीका

जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…; अतुल भातखळकारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेना म्हणजे बिनपेंद्याचा लोटा, भूमिका नसलेला पक्ष; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का?- देवेंद्र फडणवीस

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here