“किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार”

0
153

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबियासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मराठी माणसाच्या आत्महत्येवर न बोलता या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांची तुरुंगात जाऊन शेठजींच्या पक्षाची लोकं भेट घेतात. त्यांनी पहिल्यांदा सांगावं की अर्णव त्यांचा कोण लागतो, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक यांच्या आत्महत्येबाबत का बोलत नाहीत?,असा सवाल यावरुनच शेठजींच्या पक्षातल्या लोकांचा भंपकपणा आणि खोटारडेपणा सिद्ध होतो, अशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या आमचं सरकार 5 वर्ष चालणार. भाजपच्या अशा सवयीमुळेच त्यांना घरी बसवलंय, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

आता आम्ही म्हणतोय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

“बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या”

नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा…; शिवसेनेचा राणेंना इशारा

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here