…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू

0
190

अहमदनगर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन, असं बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, बिहार निवडणुकीवर बोलताना बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही. निवडणुकीत कमी-जास्त सुरु राहतं, मात्र भाजपला मोठं यश मिळालेलं नाही,असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”

“सांगलीत तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून”

ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!; किरिट सोमय्या यांचा दावा

शिवसेनेनं आत्मचिंतन केलं पाहिजे; बिहार निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here