संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात- निलेश राणे

0
171

रत्नागिरी : बिहार निवडणुकीच्या निकालात NDAची बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून 900 मतं शिवसेनेला मिळाली होती, असा उपहासात्मक टोलाही निलेश राणेंनी यावेळी लगावलाय.

महत्वाच्या घडामोडी-

नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्री बाहेर पडावं लागेल; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आयपीएल 2020 फायनल! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे- नितेश राणे

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here