असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल- रोहित पवार

0
173

मुंबई : तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी बिहार निवडणुकांवरुन भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

महाराष्टातील धामिक स्थळे दिवाळीनंतर सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here