अखेर कंगणा रणाैतचा सूर बदलला; म्हणाली, जय मुंबई, जय महाराष्ट्र

0
242

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. त्यामुळे आता कंगणाने आपला सूर बदलल्याचे दिसत आहे.

माझ्या सर्वच ठिकाणच्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा हेतूबद्दल कोणालाही शंका नाही आणि माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचं माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र! , असं ट्विट करत कंगणाने एक प्रकारे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…, रूपाली चाकणकरांचं कंगणावर टीकास्त्र

…तर आज ही वेळ आली नसती; सामना अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा

कंगना तो एक बहाना है…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

राजू शेट्टी यांना कोरोनाची लक्षणं; पहिला अहवाल निगेटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here