…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी केला परळी दौरा रद्द

0
208

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा रद्द केला आहे. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच त्यांना अभिवादन करणार आहेत.

3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती.

दरम्यान, या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच मानवंदना देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो; सोशल मीडियावर खळबळ

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव- सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षावर निशाणा

“विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here