“मोदी अहंकारी आणि हुकूमशाहीवृत्तीचे; 700 शेतकरी त्यांच्यामुळेच मेले”

0
229

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मोदीजी, तुम्ही काहीही म्हटलात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान 700 शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच शेतकऱ्यांचे मारेकरी आहात, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर आणला सत्यपाल मलिक यांनी मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतकऱ्यांचा मारेकरीच करू शकतो, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये नारायण राणेंची भर; अजित पवारांचा खोचक टोला 

“सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकारी तसेच भाजपाचे सर्व नेते मोदीसमोर मान खाली घालून गप्प बसतात. सत्यपाल मलिक यांनी मात्र धाडस करून सत्यकथन केले आहे. याआधीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन व कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केले होते, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

पंकजा ताई काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा : रोहित पवार

“बाथरूममध्ये कॅमेरा बसवून अभिनेत्री उर्वशी राैतेला करतेय अंघोळ, पहा व्हिडिओ”

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here