मुंबई : मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? असा सवाल भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांनी केला होता. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. प्रॉमिस, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कंगनाच्या या ट्विटवरुन परवेश साहिब सिंह यांनी मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? महाराष्ट्रात काय होत आहे?, असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यांच्या प्रश्नांना संजय राऊत यांनी नाव न घेता उत्तर दिलं आहे.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.
promise.
जय हिंद
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) September 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत; कंगणाचा रेणुका शहाणेंना टोला
छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करा- राम कदम
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला; कंगणाच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे भडकल्या
ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा- सुबोध भावे