“सत्य हेच आहे की, हे सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शाह”

0
389

मुंबई : आज मोदींच्या मंत्रीमंडळाचा नव्याने विस्तार होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आणि भयानक हाहाकाराचे सावट असे अनेक मुद्दे देशासमोर आहेत. असे असताना मंत्रीमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार?सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह!, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.

बाकी केवळ संगीत खुर्ची! या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहना आम्ही प्रश्न विचारत राहू. त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूध्द लढण्याचे नियोजन करण्यास वेळ नाही., अशी टीका सचिन सावंत यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो; भास्कर जाधवांचा नितेश राणेंना टोला

“ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here